अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी अनेकदा हुकली : देवेंद्र फडणवीस

मुंबई : एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचा वाढदिवस नुकताच होऊन गेला. योगायोगास की त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही वाढदिवस (२७ जुलै) झाला. यावरुन फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला की, जुलैमध्ये वाढदिवस असणारे मुख्यमंत्री होतात का? अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री नवण्याची क्षमता आहे का? यावरून फडणवीस यांनी पवारांना टोमणा मारला. त्यांची संधी बऱ्याचदा हुकली आहे.

फडणवीस आणि पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देणारे लेख लिहिले होते. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने फडणवीस यांना प्रश्न विचारला. तुमचे आणि अजित पवार यांचे नाते कसे आहे? या प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस म्हणालेत, प्रश्न नात्याचा नाही. एका वृत्तपत्राने आम्हाला दोघांना एकमेकांविषयीचा लेख मागितला. एवढी वर्षे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांचे काही ना काही कर्तृत्व तर नक्कीच आहे. वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांची कामाची शैली वेगळी आहे.

काही गोष्टींबद्दल आमचे दुमत असेल, काही गोष्टींबद्दल विरोध असेल. पण, त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान मान्य करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. म्हणून मी लेख लिहिला. त्यांनीही माझ्या कार्याविषयी त्यांना जे वाटते त्याबद्दल लेख लिहिला. त्यापलीकडे याकडे पाहण्याची गरज नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस म्हणालेत – तुम्ही याविषयी अजित पवारांना विचारले तर त्यांना जास्त आनंद होईल. पण, त्यांची संधी बऱ्याचदा हुकली आहे. पण, आता त्याबद्दल काय बोलायचे.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा