भाजप-संभाजी ब्रिगेड युतीबाबत अजित पवारांचे भाष्य, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप विरोधात शड्डू ठोकणारे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या लेखाने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आगामी निवडणुकांसाठी त्यांनी चक्क भाजपसोबत युती करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे. मराठा सेवा संघाच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपली भूमिका व्यक्त केली.

पुढे त्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड हे आता भाजपसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. यानंतर या सगळ्या पार्शभूमीवर आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ते आज पुणे येथे आढावा बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘काही संघटना राजकारणविरहित विशिष्ट उद्देशाने काम करीत असतात. तर अनेकांना वाटते की आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणाशी तरी युती करावी. त्यांना काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील. मी त्याच्यामध्ये बोलणे योग्य नाही असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा