InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘बारामती आम्हीच जिंकू’ असा विश्वास असणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांचे टीकास्त्र

‘या वेळेस बारामतीत कमळचं फुलणार’ ,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. तसेच ‘गेल्या निवडणुकीत ४२ जागा जिंकल्या होत्या यावेळेस ४३ जागा जिंकू आणि ४३ वी जागा ही बारामतीची असेल’,असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य अजित पवार यांना चांगलेच झोंबले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर  टीकास्त्र सोडलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उच्च विद्याविभूषीत आहेत. त्यांना विरोधकांना तुच्छ लेखणं शोभत नाही अशी टीका अजित पवारांनी पुण्यात बोलताना व्यक्त केली.

अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणताहेत ४५ जागा जिंकणार, एवढ्याच कशाला ४८सही जागा जिंकू असं त्यांनी म्हटलं पाहिजे. बोलताना काही तारतम्य ठेवलं पाहिजे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे. सुसंस्कृतपणा आहे. त्यामुळे त्याचा आदर्श ठेवला पाहिजे. उच्च विद्याविभूषित असलेल्या मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभत नाही ”

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.