नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पुणे : सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पटोलेंनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता, तर अधिक बरं झालं असतं, असं अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मी कशाला नाराज होणार. शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच हे आधी ठरलं होतं. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला ठरलं होतं. चर्चा करतात, नाना पटोलेंनी सर्वांशी चर्चा केली. आघाडी सरकारमध्ये चर्चेनं मार्ग काढले जात असल्याचंं पवारांनी सांगितलं.

दरम्यान, काँग्रेसला पदं मिळाली आहेत. त्यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. काँग्रेसच्या हायकमांडने निर्णय दिला असल्याचंही पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा