अजित पवार यांचे नितेश राणेंच्या टीकेवर प्रत्युत्तर, म्हणाले मी दुसऱ्याच्या टीकेला किंमत…

मुंबई : नारायण राणे यांनी अलीकडंच कोकणातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. हा दौरा राणेंच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळं गाजत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची चर्चा सुरू आहे. यानंतर यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. काही नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. जिल्हाधिकारी कुठे आहेत? तहसीलदार कुठे आहेत? विचारत आहेत. हे लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी? असा टोमणा पवारांनी नाव न घेता नारायण राणे यांना मारला.

यानंतर आता भाजप नेते नितेश राणेंनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. यानंतर आता अजित पवारांनी यावर विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी अजित पवार यांना नितेश राणेंच्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, कोणीही टीका करतं त्याला कितपत महत्त्व द्यायचे हे आपल्यावर अवलंबून असतं दुसऱ्याच्या टीकेला मी काहीच किंमत देत नाही. अशा शब्दात अजित पवार यांनी नितेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा