अजित पवारांच्या बोलण्याला काडीचीही किंमत देत नाही : गोपीचंद पडळकर

कराड : राज्यत बैलगाडा शर्यतीला परवानगी नसतानाही बैलगाडा शर्यतीचं आयोजन सांगलीत करण्यात आलं होत आणि पोलिसांना गुंगारा देत ही शर्यत संपन्न पडल्याचं पहायला मिळलं होत. सांगली पोलिसांनी जंग जंग पछाडलेल असतानाही गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत भरवून दाखवली. गनिमी कावा करत चार वेगवेगळ्या ठिकाणी शर्यतीची तयारी करून प्रत्यक्षात मात्र शर्यत वेगळ्याच ठिकाणी घेतली आणि पोलिसांनाही शर्यतीच्या ठिकाणचा तपास लागला नाही.

यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडळकरांवर टीका करत ही त्यांची स्टंटबाजी असल्याचे म्हणाले होते. आत अजित पवारांच्या टीकेला पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले. बैलगाडा शर्यत सुरु करण्याविषयी अजितदादा काय बोलतात त्याला मी काडीचीही किंमत देत नाही. अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहेत. महाविकास आघाडी सरकार मोगलांच्या वृत्तीचं सरकार असल्याचा आरोप पडळकर यांनी केलाय.

यावेळी कराडमधील बैलगाडा मालक धनाजी शिंदे यांच्या घरी गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली. तेव्हा ते बोलत होते. अजितदादा काय म्हणतात त्याला मी काडीची किंमत देत नाही. त्यांनी अनेकदा वेगवेगळे भाष्य केले आहे. हा राजकारणाचा मुद्दा नाही. त्यांची भाषणं काढून पाहा. बैलगाडा शर्यत चालू नाही झाली तर अजित पवार नाव सांगणार नाही, अशी त्यांची भाषणं आहेत. असंही पडळकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा