पुणे जिल्ह्यात ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ अजित पवारांची सक्त सूचना

पुणे : राज्यात रोज कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने देखील धुमाकूळ घातला आहे. मोठा धोका टाळण्यासाठी राज्यभरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यामध्येही वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीला हजेरी लावत काही नियम कडक केले आहेत.

यामध्ये विनामास्क फिरणार्यांना, लसीचे दोन्ही डोस न घेतल्यांना आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांना उद्यापासून बाहेर पडताना अधिक सतर्क व्हावं लागणार आहे. उद्यापासून लसीकरण झाले नसलेल्यांना पुणे जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. विनामास्क फिरणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड व विनामास्क रस्त्यावर थुंकणाऱ्याला १ हजार रुपये दंड होईल, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, अजित पवारांनी आज केलेल्या घोषणेनुसार आता पुण्यात पहिली ते आठवी चे ऑफलाईन वर्ग बंद राहतील. ऑनलाईन वर्ग पूर्वीप्रमाणे घेतले जातील. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले आहे. याच माध्यमातून त्यांचे लसीकरण देखील पूर्ण केले जाईल असा मानस अजित पवारांनी बोलून दाखवला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा