अजितदादांच्या शब्दाला राष्ट्रवादीत किंमत उरली नाही ? उपमुख्यमंत्र्यांचे ‘ते’ आवाहन महेबूब शेख यांनी धुडकावले

अमरावती : आगामी गणेशोत्सवामध्ये नवीन निर्बंध लावले जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मात्र, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून बंधने कडक केली जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

करोनाबाबतच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी नागरिकांना उत्सवात गर्दी झाल्यास निर्बंध लावण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत दिले. मात्र राज्यभर दरारा असणाऱ्या अजित पवार यांच्या शब्दाला आता राष्ट्रवादीतच किंमत उरली नाही का ? असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आहे आहे. कारण एकीकडे अजित पवारांचे आदेश दुसरीकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख मात्र या आदेशांना धुडकावत असल्याचे दिसत आहे.

महेबूब शेख यांचे सध्या विविध ठिकाणी दौरे सुरु आहेत. तसेच त्यांच्या कार्यक्रमांना लोक हजेरी लावत असून ठिकठिकाणी जाऊन गर्दी जमवत असल्याचे दिसून येत आहे. शेख हे काल दर्यापुर तालुका जिल्हा अमरावती येथे रात्री १२:३० वाजता पोहचले. यावेळी त्यांच्या उपस्थितीत याठिकाणी गर्दी झाल्याचं निदर्शनास आलं. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचंही दिसून आले. त्यामुळेच अजित पवार यांना त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी गांभीर्याने घेत नसतील तर त्यांचे आवाहन जनतेने तरी त्यांना का गंभीर्याने घ्यावे असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा