InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मायावती आणि अखिलेश विरोधी पक्षांच्या बैठकीस राहणार अनुपस्थित; विरोधकांत फुट?

उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी करून निवडणूक लढवत असलेल्या मायावती आणि अखिलेश यादव यांनी या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या बैठकीस उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती.

दरम्यान, सर्व नेत्यांची उपस्थिती निश्चित झाल्यानंतर ही बैठक 21 मे रोजी आयोजित होणार आहे. चंद्राबाबू नायडू यांनी या संदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्याशीसुद्धा यादंर्भात चर्चा केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी अशा कुठल्याही बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे.
दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मायावती आणि अखिलेश यादव यांनीही निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी विरोधकांनी बोलावलेल्या अशा कुठल्याही बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply