Akshay Kumar | छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये करणार पदार्पण

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) चे दरवर्षी 6-7 चित्रपट प्रदर्शित होतात. यावर्षी देखील त्याचे बरेच चित्रपट रिलीज झाले. त्यामधील काही चित्रपट हिट तर काही फ्लॉप ठरले. पण अशा परिस्थितीत अक्षय कुमार किंवा त्याचे चाहते निराश झाले नाही. कारण अक्षय कुमार लगेच त्याच्या नवीन चित्रपटासह चाहत्यांच्या मनोरंजनासाठी हजर असतो. बॉलीवूडमध्ये हॉरर ते कॉमेडी आणि ॲक्शनने भरलेल्या चित्रपटांसह अक्षय कुमार नेहमी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. अशा परिस्थितीत अक्षय कुमार आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन इनिंग खेळण्याच्या तयारीत आहे. बॉलीवूड बरोबरच अक्षय कुमार आता मराठी चित्रपटसृष्टी मध्ये पदार्पण करणार आहे.

अक्षय कुमार (Akshay Kumar) चे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण

सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अक्षय कुमारच्या आगामी मराठी चित्रपटाचा लॉन्चिंग व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार सोबतच महेश मांजरेकर आणि सलमान खान देखील दिसत आहे. दरम्यान, आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाबद्दल बोलताना अक्षय कुमारने म्हटले की, “माझ्यासाठी हे माझे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे.” मीडिया रीपोर्टनुसार, पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.

अक्षय कुमार दिसणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat) या मराठी चित्रपटातून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार मराठी चित्रपटसृष्टी मध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटांमध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकार करणार आहे. मोठ्या पडद्यावर सम्राट पृथ्वीराज यांची भूमिका साकारल्यानंतर आता अक्षय कुमार मराठी चित्रपटात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या लॉन्चिंग वेळी अक्षय कुमारने सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला आग्रह केला होता.

 

‘वेदात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील इतर कलाकार

‘वेदात मराठे वीर दौडले सात’ अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये बिग बॉस मराठी फेम जय दुधाने, उत्कर्ष शिंदे आणि विशाल हे देखील दिसणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर दिसणार आहे. सत्या मांजरेकर या चित्रपटांमध्ये दत्ताजी पागे यांची भूमिका पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.