काश्मीरमधील शाळेसाठी अक्षय कुमारने केला मदतीचा हात; केली एवढ्या कोटीची मदत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अभिनयासोबतच बऱ्याच वेळा समाज कार्य देखील करत असतो. या कोरोना काळात प्रत्येकाला आर्थिक फटका बसल्यामुळे अक्षयने काश्मीरमध्ये शाळा सुरु करण्यासाठी १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

गेल्या महिन्यात म्हणजेच १७ जून रोजी काश्मीरमधील सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफ काश्मीर बेसवर अक्षय कुमार गेला होता. इथे अक्षयने तुटलेली शाळा पाहिली आणि तिला पुन्हा एकदा उभारण्यासाठी देणगी देण्याची इच्छा व्यक्य केली होती.

त्यानंतर काल बीएसएफने त्यांच्या ऑफिशल ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत शाळे विषयी एक माहिती दिली आहे. शाळेसाठी पायाभरणी करण्यात आली आहे. तर या शाळेचे नाव अक्षय कुमारचे वडील हरी ओम भाटिया यांच्या नावावर ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.

दरम्यान, अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. मात्र, करोनाच्या संसर्गामुळे प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. याशिवाय अक्षयने ‘अतरंगी रे’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा