InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मनसेसमोर अभिनेता अक्षय कुमारची माघार; मिशन मंगल चं यू-टर्न

- Advertisement -

अभिनेता अक्षय कुमारचा मिशन मंगल हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा डब करून मराठीत प्रदर्शित करण्याची घोषणा शुक्रवारी केली गेली. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाइव्हमधून या निर्णयाला विरोध केला आहे.

दरम्यान ‘हिंदी भाषेतील ‘मिशन मंगल’ सिनेमाला आमचा विरोध नाही. पण मराठीत डब करण्यामागं फार मोठं षडयंत्र आहे. इतर भाषेतील सिनेमे मराठीत डब करणार असाल, तर मराठी सिनेमांनी काय करायचं असा प्रश्न अमेय खोपकर यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

इतर भाषेतील चित्रपट मराठीत डब करण्याविरोधात येत्या काही दिवसांत मोठं आंदोलन उभं करेल. सरकारनं यावर योग्य ती कारवाई केली नाही, तर चित्रपटगृहांच्या काचा फुटतील असे  अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.दरम्यान  १५ ऑग्सटला अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हा सिनेमा देशभरात हिंदीत प्रदर्शित होत आहे. तो महाराष्ट्रात हिंदीसह मराठीतही प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.