Alcohol addiction | मद्य शौकिनांनो सावधान!; दारूमुळे तरुणांवर होणारे ‘हे’ दुष्परिणाम वाचा

महाराष्ट्र देशा डेस्क : ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ने मद्यपान करणाऱ्या लोकांना धक्का बसेल असा खुलासा केला आहे. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार, जर एखादी व्यक्ती जर 2 तासांत 4-5 पेये पीत असेल तर त्याला दारूचे व्यसन आहे, असे म्हणू शकतो. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ ने वय आणि लिंगाच्या आधारावर सुमारे 2020 साली 204 देशांमधील लोकांवर हे संशोधन केले आहे. संशोधनानंतर असा दावा करण्यात आला आहे की, 15 ते 39 वयोगटातील लोकांना मद्य घेतल्यामुळे होणारे धोके जास्त आहेत.

सर्वसाधारणपणे, 40-64 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी, सुरक्षित मद्य सेवनाची पातळी दररोज साधारण प्रमाण पेय (पुरुषांसाठी दररोज 0.527 पेये आणि महिलांसाठी 0.562 मानक पेये) पासून अंदाजे दोन मानक पेये (1.69 पर्यंत) पर्यंत असते. त्यापेक्षा जास्त मद्यपान केल्याने आरोग्यास धोका निर्माण होतो.

हृदयविकार : आपले शरीर एका तासात फक्त एक पेय आणि दिवसात एकूण 3 पेये पचवू शकते, परंतु एकापेक्षा जास्त पेय पिणे नेहमीच चुकीचे असते. मद्यपानाच्या अतिसेवनामुळे हृदयविकार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. या अहवालानुसार, पुरुषांपेक्षा महिलांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. जास्त मद्यपान केल्याने हृदयरोग, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. तसेच डॉयबिटीज होण्याचे प्रमाणही वाढते.

लैंगिक क्षमतांवर परिणाम : जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने लैंगिक अवयवांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. जर अल्कोहोलचे जास्त सेवन केले गेले तर ही समस्या कायमस्वरूपी राहते. ज्याच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होतो.

मेंदू आणि यकृत : जास्त मद्यपान केल्याने त्याचा परिणाम मेंदूवर होतो. यामुळे आकलन क्षमता हळूहळू कमी होते. तसेच यकृत हे शरीरातील हानिकारक विषारी द्रव्ये नष्ट करते आणि शरीरातून काढून टाकते, परंतु जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने यकृताच्या या क्रियेवर परिणाम होतो. त्यामुळेच जेव्हा यकृत कमकुवत होते तेव्हा हानिकारक पदार्थ शरीरात साचून राहतात ज्यामुळे काही काळानंतर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. तसेच मद्यपानाचा गरोदर महिलांच्या आरोग्याबरोबरच गर्भातील बाळावरही परिणाम होतो. अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की जर गर्भवती महिलांनी अल्कोहोलचे सेवन केले तर गर्भपात आणि प्रीमॅच्युअर डिलीव्हरी अशा समस्या उद्भवू शकतात.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.