Alia Bhatt | बाॅयकाॅट ब्रह्मास्त्र दरम्यान आलिया भट्ट हिला दिलासा, ‘हा’ हॅशटॅग ट्रेंडींग

मुंबई : आलिया भट्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावेळी एकीकडे आलिया तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. त्याचबरोबर आलिया आणि रणबीरच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबाबत सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून बहिष्काराचा ट्रेंड सुरू आहे. दरम्यान, अचानक आलिया भट्टला ट्विटरवर तिच्या चाहत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. आता यानंतर लोक या चित्रपटाबद्दल अटकळ घालत आहेत की हा चित्रपट हिट होऊ शकतो का? या जोडीचा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

आलिया भट्ट हिला दिलासाः

आलिया भट्ट हिला ट्विटरवर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. त्यानंतर आता त्याचा ब्रह्मास्त्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होण्याची शक्यता वाढली आहे. आलियाबाबत ट्विटरवर वी लव्ह यू आलिया हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

गरोदरपणातही आलियाने आपलं काम सोडलं नाही. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान आलियाने नेपोटिझमवर तिची प्रतिक्रिया दिली होती, ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा शिकार व्हावं लागलं होतं.

बॉयकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंड:

जर तुम्हाला मी आवडत नाही तर माझ्याकडे पाहू नका, असं आलियाने मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आलियाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंड होऊ लागला.
आता बॉयकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंडमध्ये सोशल मीडियावर आलियाच्या समर्थनार्थ ‘वुई लव्ह आलिया भट्ट’ हा ट्रेंड सुरू आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडणार आहे.

महत्वाच्या बातम्याः

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.