Alia bhatt | “मी ब्रा का लपवायची?…”; आलिया भट्टच बोल्ड विधान

महाराष्ट्र देशा डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ आहे. ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट या महिन्याच्या ५ तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. रिलीजपूर्वी आलियाने नुकतीच एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत तिने तिचे मत परखडपणे मांडले. आलियाने सांगितले की, तिच्या या चित्रपटातून महिलांच्या वेदना दाखवण्यात आल्या आहेत. महिलांना समाजात खूप दबावाखाली जगावे लागते, असेही ती यावेळी म्हणाले. तसेच तिने या मुलाखतीत केलेलं अंतर्वस्त्रांबाबतचं (ब्रा)एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

आलियाने एका मुलाखतीदरम्यान अश्लील कॉमेंट्स आणि आक्षेपार्ह कॉमेंट्स करणाऱ्यांबद्दल तिचे मत उघडपणे व्यक्त केले. नेहमी महिलांनाच कसे जगावे, कसे कपडे घालावे याचे सल्ले दिले जातात. समाजात महिलांना कसे चुकीच्या गोष्टींना सामोरे जावे लागते आणि इंडस्ट्री असणारी लैंगिकता याबद्दलही आलिया बोलली.

ब्रा का लपवायची?

आलियाने म्हणाली की, “जेव्हा महिलांना त्यांच्या ब्रा लपवण्यास सांगितले जाते तेव्हा तिला खूप राग येतो. ती म्हणाली ब्रा का लपवायची, तेही कापड आहे. पुरुषांना त्यांचे अंतर्वस्त्र लपवण्यास सांगितले जात नाही. मला अनेकदा आक्षेपार्ह कॉमेंट्सचा सामना करावा लागला आहे. तरीही मी त्याकडे लक्ष दिले नाही. पण मी आता या सगळ्याचा खूप विचार करते. कारण मला महिलांच्या या समस्यांची जाणीव झाली आहे. आता मला समजत आहे कि मी ज्याकडे दुर्लक्ष केलं त्या लैंगिक कॉमेंट्स होत्या. कधी-कधी माझे मित्र मला सांगतात की इतकी संवेदनशील होऊ नकोस. इतकं संवेदनशील व्हायला तुला मासिक पाळी आली आहे का? मग मी म्हणते कि, मी मुळातच संवेदनशील झाले आहे आणि महिलांना मासिक पाळी येत असल्याने तुमचा जन्मही यामुळे झाला आहे.”

आलिया भट्टचा ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विजय वर्मा, रोशन मॅथ्यू आणि शेफाली शाह यांच्याही भूमिका आहेत. तर आगामी काळात ती रणवीर सिंगसोबत ‘रॉकी आणि राणीची प्रेमकथा’, रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट बॉलिवूडचे बहुप्रतीक्षित सिनेमे आहेत, ज्यांच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.