अलिया भटला स्टेजवरच कोसळलं रडू

अभिनेत्री मागच्या काही काळापासून तिच्या आगामी सिनेमा आणि रणबीर कपूरसोबतच्या रिलेशिपमुळे चर्चेत आहे. पण नुकताच आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती ओक्शीबोक्शी रडताना दिसत आहे. आलियाच्या बाजूला तिची बहीण शाहीन भट बसलेली दिसत आहे. ती आलियाला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र आलियाचं रडू काही थांबण्याची चिन्ह दिसत नाही. पण असं नक्की काय घडलं ज्यामुळे आलिया असं रडू कोसळलं.

आलियाची बहीण शाहीन तिच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. वयाच्या 13 व्या वर्षी शाहीनला डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. त्यातून बाहेर आल्यानंतर तिनं ‘आय हॅव नेव्हर बी अनहॅप्पीयर’ एक पुस्तक लिहिलं. या कार्यक्रमात बोलताना आलियानं सांगितलं, ‘मी माझ्या बहिणीसोबत राहूनही तिचं पुस्तक वाचल्यानंतर तिच्या भावना नीट समजू शकले होते.’ आलिया तिच्या बहिणीबद्दल खूपच सेन्सिटीव्ह आहे. ही गोष्ट अनेकदा दिसून आली आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.