InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अरुणिमा सिन्हा यांच्यावरील बायोपिकमध्ये आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत

दिव्यांग असतानाही आपल्या जिद्दीने माउंट एव्‍हरेस्ट सर करणाऱ्या अरूणिमा सिन्हा यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये आलिया भट्ट प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. ‘बॉर्न अगेन ऑन द माउंटेन: ए स्टोरी ऑफ लूजिंग एव्‍हरीथिंग ॲण्‍ड फायंडिंग बॅक’  या पुस्‍तकावर आधारित हा चित्रपट आहे. 

या चित्रपटाचे शुटिंग लवकरच लखनौ येथे सुरू केले जाणार असून, करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. दिव्यांग असतानाही माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरूणिमा सिन्हा या पहिल्या महिला आहेत. अरूणिमा सिन्हा या नॅशनल व्‍हॉलीबॉल प्लेअर देखील होत्‍या. काही चोरट्‍यांनी धावत्‍या रेल्‍वेमधून त्‍यांना बाहेर फेकले होते. या दुर्घटनेत अरुणिमा यांनी आपला एक पाय गमावला होता. परंतु, या दुर्घटनेनंतर त्‍यांनी हिम्‍मत हारली नाही. त्‍यांनी दिव्‍यांग असतानाही माऊंट एव्‍हरेस्‍ट सर केले. 

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.