आलिया-रणबीर या वर्षी करणार लग्न; लारा दत्ताने केला खुलासा?

मुंबई : बॉलिवूडचे कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्न कधी करणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर दोघेही याच वर्षी लग्न करणार असल्याचा खुलासा प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्त हिने केला आहे.

लारा तिच्या आगामी सिनेमा ‘बेल बॉटम’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी एका मुलाखतीत बोलत असताना लाराने आलिया आणि रणबीर यांच्या नात्याविषयी खुलासा केला. ‘मला वाटत आलिया आणि रणबीर यावर्षातच लग्न करतील’ असं लाराने सांगितले. खरंतर काही दिवसांपासून रणबीर कपूरने देखील एका मुलाखतीत, ‘जर कोरोना लॉकडाऊन नसता तर आतापर्यंत आमचे लग्न झाले असते’, असे म्हटले होते. त्यामुळे लाराच्या या खुलास्यानंतर आलिया आणि रणबीर यांचे यंदा कर्तव्य असल्याचे समजते.

आलिया आणि रणबीर यांच्या नात्याला आता ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आलिया रणबीरच नाही तर त्यांच्या कुटुंबिय देखील त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागली आहे. रणबीर आणि आलिया लग्नानंतर वांद्रे येथील त्यांच्या नव्या घरी शिफ्ट होण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा