आलियाने वडील अनुराग कश्यपवर झालेल्या आरोपांवर दिली प्रतिक्रिया म्हणाली…

मुंबई : बॉलिवूड दिग्शर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप नुकताच अनुराग कश्यपवर करण्यात आलेल्या मीटू आरोपांवर खुलासा केलाय. अनुराग कश्यपवर करण्यात आलेल्या आरोपांचा आलियावर कशाप्रकरे परिणाम झाला यावर तिने भाष्य केलंय.

या मुलाखतीत आलिया म्हणाली, “जेव्हा मीटू (#Me Too) मोहिमेत वडिलांवर आरोप करण्यात आले तेव्हा मी खूप चिंतेत होते. त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला ज्यामुळे मी खूप अस्वस्थ होते. काही लोक म्हणायचे की तो वाईट व्यक्ती आहे. मात्र माझ्या जवळच्या कुणालाही विचारा, सगळे हेच म्हणतात की माझे वडील आता पर्यंतचे सर्वात सॉफ्ट टेडी बिअर आहेत.” असं आलिया म्हणाली.

पुढे आलिया म्हणाली, “खरं तर मला या गोष्टीचा संताप येत नाही तर चिंता वाटते. मला माहितेय माझ्या वडिलांबद्दल जे लोक असं वाईट बोलतात त्यांच्याकडे आयुष्यात करण्यासाठी काहीच नाहीय. माझे वडील त्यांच्या अनेक गोष्टी माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. माझी चिंता वाढू नये असचं त्यांना वाटतं.” असं आलिया म्हणाली.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा