InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सगळे फुटीरतावादी एकाच माळेचे मणी- सेनेचा निशाणा

दहशतवादी आणि काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांवर शिवसेनेने मुखपत्र सामनातून जोरदार निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये एकीकडे जिहाद्यांचा दहशतवाद तर दुसरीकडे गिलानीसारख्या नेत्यांचा फुटीरतावाद पोसला जात आहे. या लोकांना पाकिस्तानातून रग्गड पैसा पुरवला जात आहे. अशा बांडगुळांची फक्त आर्थिक नाकेबंदी किंवा त्यांच्या नाड्या आवळून उपयोग नाही तर त्यांची पूर्ण छाटणीच करायला हवी, असे म्हणत सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल जवाहिरी याने काश्मीरवरून हिंदुस्थानला धमकी दिली आहे. त्याने काश्मीरमध्ये दहशतवाद भडकविणारा संदेश सोशल मीडियावर जारी केला आहे. तर सय्यद गिलानी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हे महाशय ‘आपण पाकिस्तानी आहोत आणि पाकिस्तान आपला आहे,’ असे गरळ ओकताना दिसतात. यावरुनच सेनेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply