“पंतप्रधान मोदींच्या विरोधात आघाडी सरकारमधील तीनही पक्ष बदनामीचा कट रचतायेत”

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सत्ताधारी मविआ सरकारने सोमवारी (११ ऑक्टोबर) रोजी ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली होती. मात्र या बंदला महाराष्ट्रातील अनेक व्यापारी संघटनांनी विरोध केला होता. यावरूनच आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

यानंतर आता भाजपच्या काही केंद्रीय नेत्याच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली होती. यावेळी महाविकास आघाडीच्या दुष्कृत्याचा, कारभाराचा, भ्रष्टाचाराचा एक पेपर काढून आम्ही लवकरच जनतेसमोर मांडणार आहोत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आणि केंद्र सरकारबाबत बदनामीचा सुनियोजित कट शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष रचत असल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केला.

तसेच पुढे या कटाचा जनतेसमोर आम्ही भांडाफोड करणार असल्याचेही शेलार म्हणाले. आपल्या खोट्या कल्पनांवर स्वतःच्या विजयाची गुढी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो सफल होऊ शकत नाही. महाराष्ट्रातली जनता त्याला थारा देऊ शकत नाही, असेही शेलार यांनी म्हटले आहे. तसेच ही बैठक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा