InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

परभणीतील दलित 14 तरुणांना एलपीजी टँकरचे वाटप

केंद्र सरकारच्या स्टँडप योजनेअंतर्गत तसेच डिक्की (दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स) आणि बँक बडोदा यांच्या संयुक्त विदयमाने डीक्कीचे संस्थापक पदमश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते मराठवाडा विभागातील 14 तरुणांना टँकरचे वितरण करण्यात आले. या वेळी बँक ऑफ बडोदाचे डेप्युटी झोनल हेड हरिष चांद, बँक ऑफ बडोदाचे पुणे झोनचे मुख्य व्यवस्थापक नितीन जमाणिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी मार्गदर्शन करताना मिलिंद कांबळे म्हणाले की, बँक ऑफ बडोदाची स्थापना करणारे सयाजीराव गायकवाड यांनी त्याकाळी डाॅ. आंबेडकरांना परदेशी शिक्षणासाठी मदत केली होती. आज बडोदा बॅंकेने दलित तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी मदत करुण इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

पुढे कांबळे म्हणाले की, आता राज्य सरकारच्या नवीन धोरणा नुसार राज्य सरकार 15 % सहभाग व केंद्र शासन 25 % असे मिळून 40% सहभाग शासन देणार असल्याने यापुढे येत्या काळात शासनाच्या सहयोगाने डिक्की दलित आदिवासी समाजातील तरुणांना व्यवसायात सक्षमपणे उभे करण्याचे काम करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply