ईव्हीएम हॅकींग टाळण्यासाठी जॅमर बसविण्याची परवानगी द्या: राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

विधानसभा निवडणूकीच्या मतदानानंतर यंत्रांत फेरफार केली जाण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यकत करण्यात आली आहे. ईव्हीएममशीन हॅक करणारी यंत्रणा किंवा व्यक्ती हॅकर हॅकिंग करुन उमेदवारांना मिळणाऱ्या मतदानात फेरफार करण्याची शक्यता आहे.त्यामुळे ही यंत्रणाकोणीही हॅक करु नये, यासाठी पुर्ण होईपर्यंत गोदामाच्या ठिकाणी २१ ते २४ ऑक्टोंबर दरम्यान, जॅमर बसविण्याची मिळावी,अशी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती विधानसभेचे उमेदवार यांचेनिवडणुक प्रतिनिधी किरण गुजर यांनी याबाबत निवडणुक निर्णय अधिकारीदादासाहेब कांबळे यांच्याकडे हि मागणी केली आहे.याबाबत गुजर यांनीपत्रकारांशी बोलताना यामागणी बाबत माहिती दिली.या पत्रात किरण गुजर यांनी नमूद केले आहे की, २१ आॅक्टोबरला मतदानसंपल्यावर सर्व ईव्हीएम मशीन्स एमआयडीसीतील वखार मंडळाच्या गोदामात ठेवलीजाणार आहेत. ही मशीन्स २४ आॅक्टोबरलाच मतमोजणीच्या वेळेस बाहेर आणुनमतमोजणी केली जाणार आहे.यावेळी ईव्हीएम मशीन हॅक करणारी यंत्रणा किंवाव्यक्ती हॅकर हॅकिंग करुन उमेदवारांना मिळणाऱ्या मतदानात फेरफार करुशकतात, अशी शक्यता असल्याने ही यंत्रणा कोणीही हॅक करु नये .यासाठी चारदिवस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला या गोदामाच्या ठिकाणी जॅमर बसविण्याचीपरवानगी मिळावी. मतमोजणी दिवशी गोदामाच्या परिसरातील ह्यरेंजह्ण असणाऱ्या सर्व मोबाईल कंपन्यांचे टॉवर मतमोजणी होईपर्यंत बंद ठेवावेत, तसेच २१ ते २४आॅक्टोबर रोजी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचीहीपरवानगी द्यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.यासाठी राष्ट्रवादीकॉंग्रेसने स्वखचार्तुन यंत्रणा उभारण्याची तयारी दर्शविली असल्याचे गुजर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.