Almond Oil | बदाम तेलाने करा पायाची मालिश, मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Almond Oil | टीम महाराष्ट्र देशा: पायाची मालिश केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. नियमित पायाची मसाज केल्याने शरीरातील थकवा दूर होऊन, झोपेची समस्या सहज दूर होते. त्याचबरोबर पायाची मालिश केल्याने पायाला पोषण मिळून अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. पायाची मालिश करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे रसायनयुक्त उत्पादन वापरतात. पण या उत्पादनांच्या ऐवजी तुम्ही बदाम तेलाने पायाची मालिश करू शकतात. कारण बदामाच्या तेलामध्ये अनेक प्रकारची पोषक घटक आढळून येतात. यामध्ये कॅल्शियम, आयरन, कॉपर, प्रोटीन इत्यादींचा समावेश आहे. बदामाच्या तेलाने पायाची मालिश केल्याने त्वचेचे अनेक आजार कमी होऊ शकतात. त्याचबरोबर या तेलाच्या वापराने शरीरही निरोगी राहू शकते. बदामाच्या तेलाने नियमित पायाची मालिश केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

वजन नियंत्रणात राहू शकते

बदामाच्या तेलाने नियमित पायाला मसाज केल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. या तेलाने नियमित पायाची मालिश केल्याने शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी होऊन, शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही नियमित बदामाच्या तेलाने पायाला मालिश केली पाहिजे.

रक्ताभिसरण सुरळीत राहते

बदामाच्या तेलाने नियमित पायाला मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते. जे निरोगी राहण्यास मदत करतात. बहुतेक लोक या तेलाने डोक्याची मालिश करतात. मात्र, बदामाच्या तेलाने पायाची मालिश केल्यास शरीरातील रक्तभिसरण सुधारून, शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

शरीरातील थकवा दूर होतो

बदामाच्या तेलामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे या तेलाने पायाची मालिश केल्याने शरीरातील अतिरिक्त थकवा निघून जाण्यास मदत होते. या तेलाच्या मदतीने मानसिक आराम मिळण्यास मदत होऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने पायाची मालिश केल्याने दिवसभराचा थकवा सहज दूर होऊ शकतो.

सांधेदुखी पासून आराम मिळू शकतो

बदामाच्या तेलामध्ये आढळणारे घटक सांधेदुखीची समस्या कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर या तेलाने मालिश केल्यास टाचांमध्ये पडलेल्या भेगांची समस्या देखील दूर होऊ शकते. हे तेल पायांची हाडे मजबूत करण्यास मदत करते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.