शरद पवार साहेबांवर टीका करण्याची मेटे यांची औकातच काय ? – अमरसिंह पंडीत

टीम महाराष्ट्र देशा :-  शरद पवार यांच्यावर टीका केली की बातम्या होतात हे तंत्र यांना चांगलं अवगत असल्याने त्यांनी शरद पवार यांनी आर्थिक निकषांवर आरक्षणासंदर्भात जे मत पुण्यातील महामुलखतीत व्यक्त केलं त्याला मेटे यांनी आरक्षणाच्या मुद्द्याला जोडण्याचा प्रकार केला असल्याचा टोला आमदार अमरसिंह पंडित यांनी लगावला आहे त्याच बरोबर विनायक मेटे जर आरक्षणाच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेत असतात तर मी स्वतः त्यांना पाठिंबा देईन मात्र काही कारण नसताना काही लोकांना पवार साहेबांवर टीका करण्याची सवय लागली आहे त्यांची औकातच काय असा सवाल पंडित यांनी महाराष्ट्र देशाशी बोलतांना उपस्थित केला आहे.

आ. अमरसिंह पंडीत यांची फेसबुक पोस्ट-

मनसेचे सर्वेसर्वा मा.श्री यांनी दिनांक २२ रोजी सायंकाळी जागतिक मराठी अकादमी व बी.व्ही.जी.आयोजित ‘ शोध मराठी मनाचा ‘ या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.खा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची मुलाखत घेतली, ही महामुलाखत उभ्या महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेने पाहिली.

मा.श्री राज ठाकरे यांनी बहुतांश मुद्द्यांना स्पर्श करत अनेक प्रश्न विचारले.वय वर्ष ७५ ओलांडल्यानंतरही अतिशय शांत आणि संयमाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासहित अनेक नेत्यांमध्ये घडलेल्या घटनांचा दाखला देत ही मुलाखत झाली. विशेष म्हणजे पवारसाहेबांचे महाविद्यालयीन शिक्षण ज्या कॉलेजमध्ये झाले त्याच कॉलेजच्या मैदानावर मा. पवार साहेबांची मुलाखत सुमारे २५ हजार श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.

आजच्या दैनिकामध्ये आमदार विनायकराव मेटे यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संदर्भात जे विधान केले ते सर्वार्थाने निषेधार्य आहे.मेटेंनी केवळ मराठा समाजाच्या मनात आस्था निर्माण करण्याच्या हेतूने आणि भाजपाच्या नेत्यांना खूश करण्यासाठी हा सगळा प्रपंच केला आहे,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

आरक्षणाच्या संदर्भात मा. श्री राज ठाकरे यांनी प्रश्न विचारला होता की, आरक्षण देऊनही अनेक लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, संधी मिळत नाही आणि त्यामुळे युवा पिढी दिवसेंदिवस नाउमेद होत चालली आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया देत पवार साहेब म्हणाले की, गरजूंना आर्थिक निकषावर आधारित आरक्षण मिळायला हवे होते. त्यांनी केलेले भाष्य विशिष्ट समाजाविषयी नव्हते परंतु आज पर्यंत केवळ आणि केवळ मराठ्यांना आरक्षण या विषयावर उभ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मीच नेतृत्व करतो असे मेटे समजत असतील तर तो त्यांचा गैरसमज आहे. मला त्यांची कीव येते.

मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून समाजातील काही तरुण मुले मुली हे रस्त्यावर आले..शेकड्याने जमा झाले.. हजारांनी निघाले आणि लाखाने एकवटले हे केवळ विद्यमान राज्यकर्त्यांच्या विरोधात आरक्षणाच्या मुद्यावर संताप व्यक्त करण्यासाठी. या मोर्चाचे श्रेय जर विनायकरावजी आपण घेत असताल तर ते चुकीचे होईल.

या सरकारला आपण पाठिंबा दिलेला आहे किंबहुना ेचा उमेदवार म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाचे नाव आपण आपल्या नाम निर्देशनपत्रात लिहिलेले आहे (भले बाहेर आपण पक्षाचे आमदार म्हणत असाल) त्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारा की मराठ्यांना आरक्षण कधी देणार ? आरक्षणाचे मोर्चे निघत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सहित सर्व कार्यकर्ते या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर आले होते, हे मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही.

विनायकराव एक विनंती करतो तुम्हाला, गल्लीत बसून पेपरबाजी करण्याऐवजी राज्याच्या सर्वोच्च पंचायतीमध्ये ( विधानपरिषद अधिवेशनात) हिम्मत असली तर एक आवाहन करा आणि सरकारला हे अधिवेशन संपायच्या आत आरक्षण जाहीर करावे, नसता मी वेगळा विचार करेल असे बोलण्याची हिंमत दाखवा, मेटे साहेब,हे तुम्ही करू शकणार नाहीत कारण तुम्हाला मंत्री व्हायचेय…

असो,आरक्षणाच्या नावावर पवार साहेबावर चिखलफेक करण्याऐवजी नजीकच्या काळात आपण आपले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार काय दिवे पाजळतात यांच्याकडे ही युवा पिढी लक्ष देऊन आहे.

विनायक मेटे हे अमरसिंह पंडीतांचे आव्हान स्वाकारतील का?

आमदार पंडितांच्या या आव्हानानंतर आरक्षणाचं श्रेय घेऊ पाहणाऱ्या आणि एकला चलोरे ची भूमिका अवलंबनारे मेटे हे आव्हान स्वीकारतात का हे पहाण महत्त्वाचं ठरेल.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.