InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अंगावर काटा उभा करणारा ‘अमावस’चा ट्रेलर प्रदर्शित

हॉरर सिनेमांची एक वेगळीच मजा आहे. जेव्हा या सिनेमात उत्तम टेक्नीक वापरलं जातं तेव्हा हा सिनेमा अधिक उत्तम बनतो. ‘अमावस’ हा सिनेमा अशाच एका गोष्टीचा साक्षीदार बनला आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला.

सिनेमाचा ट्रेलर पाहून लक्षात येतं की हा सिनेमा  सगळ्या हॉरर सिनेमांपेक्षा वेगळा आहे.नर्गिस फाखरी या सिनेमात वेगळ्या अवतारात दिसणार आहे.  नर्गिससोबत या सिनेमात लीड रोलमध्ये सचिन जोशी असणार आहे. मोना सिंह देखील या सिनेमात वेगळ्या रुपात दिसत आहे.मोना या सिनेमात असं कॅरेक्टर प्ले करत आहे जिला आत्मा, प्रेत यांच्याबद्दल सगळी माहिती आहे.

भूषण पटेल आपल्याच हॉरर सिनेमांचे रेकॉर्ड तोडणार का? याकडे साऱ्यांची लक्ष लागून राहिली आहेत. हा सिनेमा ११ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.