Ambadas Danave | कडू-राणा वादावर अंबादास दानवेंचं वक्तव्य, म्हणाले…

Ambadas Danave | मुंबई : आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे.गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यांच्या आरोपाला उत्तर देताना बच्चू कडू यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी या वादामध्ये उडी घेतली आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे (Ambadas Danave)

कुठेतरी पाणी मुरत आहे. म्हणूनच रवी राणा यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी आरोप केला आहे. त्यांनी केलेला आरोप कदाचित चुकीचाही असेल. त्यामुळे या आरोपाची चौकशी करायला हवी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

तसेच रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवणीत राणा यांनी याआधी जी विधानं केलेली आहेत, त्याची सरकारकडून चौकशी केली जात आहे. रवी राणा यांनीच मी केलेल्या आरोपाची चौकशी करायला हवी, अशी भूमिका विधानसभा अध्यक्षांकडे मांडायला हवी. याआधी ते लोकसभा अध्यक्षांकडे गेले होते. फक्त बोलून काहीही होणार नसल्याचंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे समर्थक आहेत. तर बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या गटातील आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राणा आणि कडू यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमधील वाद मिटणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.