Ambadas Danve | अंबादास दानवेंची जीभ घसरली, राज्यपालांवर टीका करताना म्हणाले…

Ambadas Danve | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासोबत केली. यानंतर राज्यात वातावरण तापलेलं दिसत आहे. अनेक नेके कोश्यारींवर टीका करत असून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टीका केली आहे. यावेळी मात्र, दानवेंची जीभ घसरल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अरे हरा***, मी बोलणाराच, काय गुन्हा दाखल करायचा माझ्यावर तो करा. छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळाचे देखील आदर्श आहेत लक्षात ठेवा, मी जबाबदारीने बोलतो. गुन्हा दाखल झाला आणि अटक झाली तरीही चालेल, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

अरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे भवानी तलवार होती. आज जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी तुझी जीभ एका मिनटात कापली असती, असा घणाघात देखील दानवेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.