Ambadas Danve | “अजित पवारांना मुख्यमंत्री करा अन् एकनाथ शिंदेंना…”; अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य

Ambadas Danve | मुंबई: गेल्या वर्षभरापासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गट सामील झाल्यानंतर याला आणखीन कलगीतुरे फुटताना दिसत आहे. आपल्याकडे अर्थ खात असावं यासाठी अजित पवार गट आग्रही आहे. तर अजित पवारांना अर्थ खात देण्यास शिंदे गटानं नकार दर्शवला आहे.

Make Ajit Pawar Chief Minister – Ambadas Danve

मंत्रिमंडळ विस्तार आणि सध्याच्या राजकीय स्थितीवर विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “अर्थ खात्यावरून राज्य सरकारमध्ये सुरू असलेला गोंधळ पाहता अजित पवारांना मुख्यमंत्री करा. तर अर्थ खात एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) देऊन टाका आणि हा तिढा सोडवा.”

पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले, “शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेक नाग भाजपने युती करण्यासाठी गळ्यात अडकवले आहे. मात्र, भाजप त्यांना काम करू देणार आहे का? आपल्याला मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा अनेकजण ठेवून बसले आहे.

मात्र सध्याची स्थिती पाहता त्यांचे शिवलेले कोट कपाटातच राहतील, असं वाटत आहे. शरद पवारांसोबत असताना अजित पवार दिल्ली वारीवर टीका करत होते. आता ते स्वतः दिल्ली दरबारी जाऊन मुजरा करत आहेत.”

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं (Ambadas Danve) आहे. यावरून आमदार बच्चू कडू मंत्री पदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होते.

परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना थांबवल्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय तुर्तास मागे घेतला आहे. 17 जुलै रोजी आमदार बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून 18 तारखेला त्यांचा निर्णय जाहीर करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3DdeRAo