Ambadas Danve | “आदित्य ठाकरेंच्या सभेने सत्तारांना मिरची झोंबली”; अंबादास दानवेंचा टोला

Ambadas Danve | औरंगाबाद : शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांची सिल्लोडमध्ये सभा होणार असल्याची घोषणा ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. त्यानंतर लगेच अब्दुल सत्तारांनी खासदार श्रीकांत शिंदेंच्या सभेची घोषणा केली आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अब्दुल सत्तारांना चांगलाच टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या सभेची मिरची झोंबली, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चिमटा काढलाय. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना सिल्लोडमध्ये येऊन शिवसंवाद यात्रा घेऊन दाखवण्याचे आव्हान केले होते. हे आव्हान स्वीकारत त्यांनी सिल्लोडमधील सभेची घोषणा केली.

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, आदित्य ठाकरेंची सभा जाहीर झाल्यानंतर राज्यात वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गद्दार आणि मोठा कोका असलेल्या सत्तारांचा भांडाफोड आदित्य ठाकरे करणार आहेत. त्यामुळे सत्तार यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यांना चटका बसला आणि मिरच्याही झोंबल्या. म्हणून त्यांनी त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा त्याच दिवशी ठेवली असल्याचं दानवे म्हणालेत.

पुढे ते म्हणाले, सभा घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यामुळे त्यांनी सभा घ्यावी. आम्ही देखील ठरल्या प्रमाणे आदित्य ठाकरे यांची सभा घेणार आहोत. बुलढाण्याहून आदित्य ठाकरे सिल्लोडमध्ये येणार आहेत. तिथून औरंगाबादला बजाजनगरमध्ये त्यांच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात ते परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याची माहिती अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी यावेळी बोलताना दिली.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.