Ambadas Danve | किरीट सोमय्या यांच्याविरोधात मी पुरावे सादर करेल; अंबादास दानवेंचा मोठा दावा

Ambadas Danve | मुंबई: किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओनंतर विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठा दावा केला आहे. किरीट सोमय्या यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

Bharatiya Janata Party only gossips about the culture of Maharashtra – Ambadas Danve

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “भारतीय जनता पार्टी फक्त महाराष्ट्राच्या संस्कृतीवर गप्पा मारते. या व्हिडिओ प्रकरणावरून गेल्या काही महिन्यांपासून महिला आमच्याशी संपर्क साधत आहे. येत्या काळात या महिला किरीट सोमय्या यांचे वेगवेगळे विषय जनतेसमोर मांडणार आहे.

किरीट सोमय्या यांनी गृहमंत्र्यांना मागणी केली असेल तर त्यांचं स्वागत आहे. गृहमंत्र्यांनी या प्रकरणावर ताबडतोब चौकशी करायला हवी. सभागृहात मला संधी मिळाली तर या प्रकरणावर मी योग्य ते पुरावे नक्की सादर करेल.”

दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (18 जुलै) दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून धारेवर धरलं होतं. तर आज किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडिओवरून सभागृहात गदारोळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी किरीट सोमय्या प्रकरणावर आज सभागृहात (Ambadas Danve) काय चर्चा होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

किरीट सोमय्या यांनी या व्हिडिओ (Ambadas Danve) प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मी अनेक महिलांवर अत्याचार केले अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहे आणि त्यांचे अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असे दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलावर अत्याचार झालेला नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो”, अस किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44NRMzJ