Ambadas Danve | “केसीआर मटण खाऊन पंढरीला गेले अन्…”; अंबादास दानवेंची केसीआरवर खोचक टीका

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) काल पंढरपूरमध्ये होते. पंढरपूरमध्ये त्यांनी जाहीर सभा घेतली. त्याचबरोबर त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पंढरपूरला पोहोचण्याआधी केसीआर यांच्यासाठी मटणाचा बेत आखण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

KCR has tried to show false devotion – Ambadas Danve

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “पंढरपूरच्या नावानं केसीआर यांचा हा दौरा होता. परंतु हा फक्त देखावा होता. पंढरपूरला पोहोचण्याआधी 100 बोकडे आणि 500 कोंबड्या असा त्यांचा जेवणाचा बेत होता. कोंबड्या आणि बोकडे कापून खाऊन ते पंढरपूरच्या दर्शनाला गेले. केसीआर यांनी खोटी भक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.”

पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले, “तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये फरक आहे. पंढरीला जाणारे वारकरी शुद्ध शाकाहारी असतात. शेकडो किलोमीटर पायी चालून वारकरी पांडुरंगाचे दर्शनाला जातात. ही महाराष्ट्राच्या जनतेची भक्ती आहे. केसीआर यांनी हे फक्त शक्तीप्रदर्शन म्हणून केलं आहे.”

महाराष्ट्रामध्ये अनेक बाहेरच्या नेत्यांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, इथे कोणी टिकत नाही. केसीआर यांनी महाराष्ट्रात लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर तेलंगणा त्यांच्या हातातून निघून जाईल”, असेही ते (Ambadas Danve) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/434f3fI