Ambadas Danve | खत, बियाणे डबलचा भाव, शेतकऱ्यांना मदत अर्धीच करता राव; अंबादास दानवेंचं सरकारवर टीकास्त्र

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले होते. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड आणि जालना या भागातील प्रशासनाने नुकसान भरपाई म्हणून 1501 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, सरकारने फक्त 763 कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.

अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. खत, बियाणे यांचा डबलचा भाव झाला आहे. हे सरकार शेतकऱ्यांना मदत अर्धीच करत आहे, असं अंबादास दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ट्विट करत अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “खत, बियाणे डबल चा भाव, शेतकऱ्यांना मदत अर्धीच करता राव! ‘कसले काय ते निकष बदलणार.. निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करणार. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे!’ व्वा रे डायलॉग!”

‘Ardhavatrao’ is the government and its stewards – Ambadas Danve

“वाढीव दराने मदत करायचे आश्वासन कोणत्या नदीत बुडवले मुख्यमंत्री आणि सुपर मुख्यमंत्री महोदयांनी? अर्धवट मदत करताच कशी? शेतकऱ्यांना सूर्यप्रकाशा इतकेच स्पष्ट दिसत आहे की ‘अर्धवटराव’ हे सरकार आणि त्याचे कारभारी आहेत,” असही त्यांनी (Ambadas Danve) या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3CPz0fG