Ambadas Danve | “जे गेले ते परत येण्यासाठी संपर्क करत आहेत” ; अंबादास दानवेंचे मोठे विधान

औरंगाबाद : “आपला भगवा-आपली शिवसेना” या मोहिमेचा प्रारंभ औरंगाबादमध्ये झाला. या मोहिमेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

“माझा भगवा- माझी शिवसेना” या योजनेविषयी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. दानवे म्हणाले, ” ज्यांना जायचे होते ते गेलेले आहेत, आता कुणी जाण्याची शक्यता नाही. उलट जे गेले ते आमच्याशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे हा विषय इथेच संपला आहे. “तीन सदस्य प्रभाग रचनेची भीती भाजपाला वाटत होती म्हणूनच प्रभागरचनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदल केला आहे,” असा आरोप अंबादास दानवे यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.