Ambadas Danve | “… तर दिवाळीनंतर आम्ही रस्त्यावर उतरणार”, अंबादास दानवेंचा अब्दुल सत्तारांना जाहीर इशारा
Ambadas Danve | मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी विरोधकांची मागणी आहे. यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिलेल्या उत्तराने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते संतापले आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अब्दुल सत्तार यांना जाहीर इशारा दिला आहे.
राज्यात या वर्षी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चारवेळा अतिवृष्टी झाली असून याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, सध्या शेतात गुडगाभर पाणी आहे, आताचे पीक तर हातातून गेले मात्र, पुढचं पीक देखील शेतकऱ्यांना घेता येते की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच जर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर, दिवाळीनंतर रस्त्यावर उतरु, असा इशारा देखील दानवेंनी दिला आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असे सत्तार म्हणाले आहेत. अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात ओल्या दुष्काळासारखी स्थिती निर्माण झालेली नाही. मात्र शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पंचनामे वस्तुनिष्ठ पद्धतीने केले जातील. आता दिवाळीच्या सुट्या लागणार आहे. एक-दोन दिवस शासकीय कर्मचारी सुटीवर असतील. मात्र 15 दिवसांच्या आत सरकारकडे नुकसानीचे आकडे येतील. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असं अब्दुल सत्तारांनी सांगितलं आहे.
तसेच, ओल्या दुष्काळासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा केली जाणार का?, असा सवाल सत्तारांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले,. मंत्रीमंडळ बैठकीत काय बोलावे, काय नाही हे गोपनीय ठेवावे लागते. मंत्रीमंडळाचा तो अधिकार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर चर्चा तसेच घेतलेले निर्णय सार्वजनिक केले जातील.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs Pak | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीचे रोहित शर्माच्या कर्णधारपदावर मोठं वक्तव्य
- Abdul Sattar | मराठवाडा दौऱ्यावरून अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला, म्हणाले…
- Mohammed Shami : मोहम्मद शमी भारत-पाक सामन्यात गोलंदाजी करणार नाही; या माजी खेळाडूने सांगितले मोठे कारण
- Ajit Pawar | “…त्यापेक्षा त्यांनी सरळ रांगेत उभं राहावं”, अजित पवारांना ‘या’ आमदाराचा खोचक सल्ला
- Raju Shetti | “पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे…”; अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राजू शेट्टी आक्रमक
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.