Ambadas Danve | “पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची हिंमत होते, ते हात तोडले पाहिजेत” – अंबादास दानवे

Ambadas Danve  | छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये ( Chhatrapati Sambhajinagar ) काल रात्री दोन गटात वाद झाला होता. वाहनाचा अपघात झाल्यानंतर चालकांमध्ये वाद – विवाद झाले. या वादाचे रूपांतर दंगलीत व्हायला फार वेळ लागला नाही. काही समाज कंटकांनी घोषणा दिल्या, यामुळे आता हा वाद नेमका धर्मभेदामुळे झाला की काय? असा सवाल उपस्थित होतोय. यावर  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

What Happen Last Night in Chhatrapati Sambhajinagar

काल रात्री संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा झाला. वाहनाचा अपघात झाल्यानंतर चालकांमध्ये वाद – विवाद झाले. वादाचे रूपांतर दंगलीत  झाले. वाद मिटवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या २० गाड्या जाळण्यात आल्या. मात्र आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण शांत पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांनी येऊन आज छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थितीची पाहाणी केली.

काय म्हणाले अंबादास दानवे (What Did Said Ambadas Danve?)

काल झालेल्या वादावर आज अनेक नेते मंडळी छत्रपती संभाजीनगरमध्ये हजेरी लावत आहेत. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हजेरी लावली. ते म्हणाले, “महिन्याभरापासून आम्ही आवाहन करत आहोत. शहराचं वातावरण अशांत करून जनतेच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न चालू आहे. मुस्लीमांच्या बाजूने एमआयएम सारखी संघटना उभी राहते आणि पोलिसांवर हल्ला होतो. याला कोण जिम्मेदार आहे? ते हात तोडले पाहिजेत.” असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

Chandrakant Khaire comments On Sambhajinagar

चंद्रकांत खैरे यांनी झालेल्या वादावर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहणी करायला जाताना त्यांनी माध्यमांशी सवांद साधला. खैरे यांनी इम्तीयाज जलील यांच्यावर निशाणा साधला . “इम्तियाज जलील इथे निवडून आल्यापासून हा गोंधळ सुरु झाला. त्याला फडणवीस आणि मिंधे गट मदत करतात. एवढे दिवस तिथे उपोषण केलं. रात्रभर गोंधळ घालू लागले. बिर्याणी खाऊ लागले, हे पोलिसांना कळलं नाही का, तत्काळ त्यांना उचलून फेकून द्यायला पाहिजे. याआधीही जलील यांनी असंच नाटक केलं होतं. त्याच्याच मोबाइलने फोन केला, १० हजार लोक गोळा केले, परत म्हणतो शांती रखो. आधी उचकवायचं आणि आता शांती रखो म्हणतात, असे चंद्रकांत खैरेंनी वक्तव्य केलं.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed.