Ambadas Danve | मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही?; अंबादास दानवे म्हणाले, “प्रत्येकाला दिलेला शब्द…”

Ambadas Danve | मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट तयार झाले. ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष राज्यात पेटलेला आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याणं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सतत टीका होत आहे. अशातच मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत आहे, यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

मंत्रिमंडळाचा (Cabinet)  विस्तार झाल्यास काही लोक सोडून जातील अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटत असल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याचं अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटलं आहे. शब्द बऱ्याच लोकांना दिले आहेत. प्रत्येकाला दिलेला शब्द पूर्ण करणं अवघड आहे. त्यामुळे याच भीतीपोटी मंत्रिमंडळ विस्तार होत नसून याला दुसरं कुठलंही कारण नाही”, असं दानवे यांनी म्हटलं आहे. मागाठाणेच्या ‘मालवणी’ महोत्सवात अंबादास दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

लंबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया देताना काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारला जोरदार टोला लगावला होता. शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारालाच मंत्रिपद हवं आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. यांच्यासोबतच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. जोपर्यंत बहुमत आहे, तोपर्यंत सरकार सत्तेत राहील,असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देखील काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये यावर भाष्य केलं होतं. “मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे बाहेर पडू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत” असे खडसे यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.