Ambadas Danve | “महाराष्ट्रामध्ये आलेल्या गद्दारीच्या पीकाला समुळ नष्ट होऊ दे” ; अंबादास दानवेंची गणरायाला प्रार्थना

औरंगाबाद : औरंगाबाद शहरांमधील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ढोलच्या तालावर ठेका धरत ढोल वाजविला. दोन वर्षे कोरोनामुळे सर्व बंद होते यावर्षी ढोल ताशे लेझीम सगळे बाहेर आलेले आहे, आणि लहानपणापासून आम्ही वाजत आलेलो आहे,

मी ढोल वाजवण्याचा आनंद घेत असतो आजही ढोल वाजवण्याचा मजा असतो सगळं विसरून ढोल वाजून गणपती समोर मजा काही औरच आहे. असे शहराच्या मुख्य मिरवणुकीमुळे बोलले आज गणेश विसर्जन मिरवणूक होती त्यावेळी त्यांनी गणेशाला एकच प्रार्थना केली. की या महाराष्ट्रामध्ये गद्दारीचे जे पीक आलेले आहे ते समुळ नष्ट होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी आज विघ्नहर्ता गणपती चरणी केली असल्याचे प्रतिनिधी माध्यमांशी बोलले.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.