Ambadas Danve | “मुलींची बेपत्ता होण्याची संख्या…”; अंबादास दानवेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील 18 ते 25 वयोगटातील तरुणींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मार्च महिन्यामध्ये तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्या असल्याचं समोर आलं आहे. तर दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला पत्र पाठवलं आहे.

अंबादास दानवे म्हणाले, “महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारे राज्य आहे. मागील कित्येक वर्षाच्या राज्य सरकारच्या कामावरून हे सिद्ध झालं आहे. मात्र राज्यातील मुली बेपत्ता होण्याची वाढती संख्या ही अतिशय चिंताजनक बाब आहे.”

पुढे ते म्हणाले, “राज्यामध्ये दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहे. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान राज्यातून सुमारे 5510 मुली गायब झाल्याची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत चालली आहे. ही बाब महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यासाठी चिंताजनक आहे. ” राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोरवारा उडाला आहे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

अंबादास दानवेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र (Ambadas Danve’s letter to Devendra Fadnavis)

महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. अशात राज्यात मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढणे, ही राज्यासाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणी योग्य ती पावले उचलून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या,अशी मागणी अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महिला व बाल विकास मंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Mg9kgq

You might also like

Comments are closed.