Ambadas Danve | “…म्हणून शिंदे गट, भाजप, मनसे महापालिकेसाठी एकत्र येतील”; अंबादास दानवेंनी बोचरी टीका

Ambadas Danve | औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. मनसे भाजप आणि शिंदे गटासोबत युती करणार का? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शुक्रवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर आगामी मुंबई महापालिकेसाठी हे तीन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात महायुतीचा प्रयोग होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली. याबाबत अंबादास दानवे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देताना तिनही नेत्यांना खोचक टोला लगावला आहे. या तिनही नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरे यांची दहशत आहे, त्यामुळे हे महापालिका निवडणुकीत एकत्र येतील असं अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणालेत.

तसेच या तिंघाना लोक मोठे नेते का म्हणतात हेच मला कळत नाही असं म्हणत दानवेंनी टोला लगावला आहे. एक जण चाळीस आमदार घेऊन बाहेर पडला. यात कसला आला? मोठेपण याला गद्दारी म्हणतात असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. एकाचा तर एकही आमदार या महाराष्ट्रात नाही असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. तसेच फडणवीस हे तर मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले मग त्यांना मोठं म्हणायचं का असा सवाल दानवे यांनी केला आहे.

दरम्यान, या चर्चांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना उत्तर दिले. हा सणाचा विषय होता. त्यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. मात्र यावर राष्ट्रवादीकडून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. तिघेही एक होत असतील, तर यात नवल ते काय, चुकीचे काय? दिवाळीत सर्वांनी एकाच ठिकाणी यावे, एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात. असं अजित पवार म्हणालेत. त्यामुळे मुंबईच्या महापालिका निवडणूक मनसे भाजप आणि शिंदे गटासोबत लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.