Ambadas Danve | “राज्यपाल कोश्यारी यांना पाणी पाजल्याशिवाय गप्प बसणार नाही”, अंबादास दानवेंचा इशारा

Ambadas Danve | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठावाडा विद्यापीठातील कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासोबत केल्याच्या मुद्द्यावरुन विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. या मुद्द्यावरून आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना “आम्ही राज्यपाल कोश्यारी यांना पाणी पाजल्याशिवाय गप्प बसणार नाही”, असा इशारा अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिला.

“सावरकरांविषयी ते रस्त्यावर उतरतात. मात्र छत्रपतींविरोधात वक्तव्य केल्यानंतर रस्त्यावर उतरताना तुमची दातखिळी बसते का?”, असा सवाल करत अंबादास दानवेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र महापुरुषांची जननी आहे. देशभक्त, स्वातंत्र्यवीरांची जननी आहे. तरीदेखील महाराष्ट्राची प्रतिमा मलीन केली जात आहे, अशी टीका दानवे यांनी केली आहे.

दानवे म्हणाले, “कोश्यारी महाराष्ट्रातील महापुरूषांविषयी विधाने करत आहेत. कोश्यारी दिल्लीतील बादशहाच्या इशाऱ्यावर अशी वक्तव्ये करतात का?” ते महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या महाराष्ट्राचे पाणी साधे नाही. कोश्यारी यांना पाणी पाजल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही, असा थेट इशारा अंबादास दानवे यांनी दिला.

काय म्हणालेत भगतसिंह कोश्यारी?

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.” तसेच “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हंटल आहे

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.