Ambadas Danve | “सर्व आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, नाहीतर…”; निधी वाटपावर अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका

Ambadas Danve | मुंबई: आज महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी सभागृहात निधी वाटपावरून प्रचंड गदारोळ झाल्याचं दिसून आलं आहे.

या प्रकरणावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. सर्व आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

Unequal allocation of funds is unfair – Ambadas Danve

निधी वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “असमान निधी वाटप करणं हा अन्याय आहे. सरकारनं याबाबत खुलासा करायला हवा.

सरकारनं एखाद्या आमदाराला 50 दिले, कोटी कुणाला 60 कोटी दिले, तर कुणाला 2 कोटीही दिले नाही. सरकारनं याबाबत स्पष्टीकरण घ्यावं. यासाठी कुणी कुणाला कोणत्या नंबरवरून फोन केला होता हे सांगायला मला भाग पाडू नका.

मी याबाबत स्पष्टीकरण देऊ शकतो. मात्र याबद्दल खुलासा करण्याची माझी मुळीच इच्छा नाही. सर्व आमदारांना समान निधी मिळायला हवा.”

दरम्यान, निधी वाटपावरून विरोधकांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका (Ambadas Danve) केली आहे. अजित पवारांनी निधी वाटप करताना भेदभाव केला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. सर्वांना समान निधी वाटप झाला असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.

निधी वाटपावर (Ambadas Danve) प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “निधी वाटपानंतर विरोधक टीका आणि आरोप करताना दिसत आहे. मात्र, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं  तथ्य नाही. सर्व आमदारांना समान निधी देण्यात आला आहे. यामध्ये कुणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44E78r5