अंबादास दानवेंनी ‘असा’ केला वाढदिवस साजरा

औरंगाबादमध्ये राजकीय नेत्यांचे वाढदिवस म्हटले की सजवलेले स्टेज, शुभेच्छा देण्यासाठी हातात बुके घेउन ताटकळत थांबलेले कार्यकर्ते आणि काहीतरी काम काढून घेण्यासाठी जमलेले लोक असे सर्रास चित्र डोळ्यापुढे तरळते. आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसाने. सध्या कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. यामुळे पदाधिकाऱ्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात जाउन 10 क्‍विंटल कांदा वाटून वाढदिवस साजरा केला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी हा उपक्रम राबवला.

राजेंद्र राठोड यांनी शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करून तो शहरी भागातील अजबनगर, समतानगर, गांधीनगर, माळीवाडा या वार्डातील तब्बल 500 कुटूंबांना प्रत्येकी दोन किलो कांद्याचे वाटप केले. कन्नडचे शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे , जिल्हा परिषद सदस्या मोनाली राठोड उपस्थित होते. आमदार श्री. दानवे म्हणाले, की सामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणे, त्यांना मदत करणे हीच शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे.

अजबनगर येथे विभागप्रमुख सतीश कटकटे, नंदू लबडे, प्रविण शिंदे, संजय लोहिया , रवी लोढा, बाळासाहेब दानवे, रोहित कुलकर्णी, सचिन कुदळे, सागर पवार, धर्मराज दानवे, वैभव जाधव, ऋषिकेश गावंडे, भगवान पालकर, धरमसिंग साळूंके, स्वप्निल पाटील, खोकडपुरा गांधीनगर येथे शाखाप्रमुख रणजित दाभाडे, राजेंद्र जाधव, गोकुळ डुलगज, रुपेश काळवणे, सुनिल धूत, अक्षय जिनवाल, समतानगर कोटलाकॉलनी येथे शाखाप्रमुख महेश मलेकर, जीवन रनसिंग, शुभम झोबडे, विकी आव्हाड, अविनाश जगताप, बंटी प्रधान, राजू अजमेरा आदींनी परिश्रम घेतले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.