InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा यूटर्न; अमेरिका आता दखल देणार नाही

- Advertisement -

जम्मू-काश्मीर प्रकरणावर भारताला मध्यस्थतेची ऑफर देणाऱ्या अमेरिकेने आता यूटर्न घेतला आहे. काश्मीर मुद्द्याला द्विपक्षीय असल्याचे सांगत यात आता अमेरिका दखल देणार नसल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत भारताचे राजदूत हर्षवर्धन सिंगला म्हणाले की, अमेरिका दुसऱ्यांदा आपले जुने धोरण अवलंबणार आहे. काश्मीरप्रश्नी भारत-पाकिस्तानने एकत्र येऊन मार्ग काढावा, असे अमेरिकेने म्हटले आहे.

यापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ऑफर दिली होती की, जर त्यांची इच्छा असेल तर अमेरिका काश्मीर प्रकरणात मध्यस्थता करू शकते. परंतु भारताने यावर आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले होते की, काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे. यावरचा निर्णय केवळ दोन देशच करू शकतात. काश्मीरमधून कलम 370 हटल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेला मदत मागत असताना आता अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.