Amit Shah | इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत अमित शाहांचं ट्विट, म्हणाले…

Amit Shah | रायगड: रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशात रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे मोठी घटना आहे. या वाडीवर दरड कोसळली (Irshalgad Landslide) आहे. काल रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

रायगडमध्ये घडलेल्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी ट्विट करत खंत व्यक्त केली आहे. ट्विट करत अमित शाह म्हणाले, “महाराष्ट्रातील रायगड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाबाबत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं केलं आहे.

NDRF च्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचाव कार्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे हे आमचे प्राधान्य आहे.”

दरम्यान, 19 जुलै रोजी रात्री सुमारे 10.30 ते 11 वाजता ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली (Amit Shah) आहे. गावातील लोक झोपेत असताना ही दुर्घटना घडली आहे. 50 ते 60 घरांची ही वस्ती अख्खी मातीच्या ढिगार्‍याखाली गेली आहे. या दुर्घटनेनंतर सर्वत्र खळबळ आहे.

It is estimated that 200 people are trapped under the collapsed ravine

या कोसळलेल्या दरडीखाली तब्बल 200 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आतापर्यंत या ठिकाणी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली (Amit Shah) आहे.

दुर्घटनास्थळी मदतीसाठी अग्निशामक दल, रुग्णवाहिका, NDRT, TDRF दाखल झाले आहे. तर या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44oXjwZ

You might also like

Comments are closed.