Amit Shah | महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Amit Shah | नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavraj Bommai) यांची विशेष बैठक बोलावली होती. ही बैठक संपल्यानंतर अमित शाह यांनी माध्यमांशी बोलताना या वादावर तोडगा काढण्यासाठी काय निर्णय घेण्यात आले याची माहिती सांगितली.
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा यासंदर्भात निर्णय येत नाही, तोपर्यंत कुणीही राज्य एकमेकांच्या राज्यावर दावा सांगणार नाही, असं या बैठकीत ठरलं असल्याची माहिती अमित शाह यांनी दिलीय. पुढे ते म्हणाले, दोन्ही राज्यांचे मिळून दोन्ही बाजूंनी तीन – तीन असे सहा मंत्री एकत्र बसून यासंदर्भात सविस्तर चर्चा करतील.
पुढे ते म्हणाले, “दोन्ही राज्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सामान्य राहील, अन्यभाषिक व्यापारी किंवा सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागू नये यासाठी वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्य एक समिती तयार करण्यावर सहमत झाले आहेत. ही समिती कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करेल.”
यावेळी बोलताना त्यांनी बसवराज बोम्मई यांच्या ट्विटरचा मुद्दा देखील स्पष्ट केला आहे. काही सर्वोच्च नेत्यांच्या नावाने बनावट ट्विटर खाती तयार करून त्यावरून अफवा पसरवल्या गेल्या. हा प्रकार गंभीर यासाठी आहे की अशा प्रकारच्या ट्वीट्समुळे लोकांच्या भावना भडकवण्याचं काम होत आहे. त्यामुळे अशा बनावट खात्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असं अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- IPL Auction 2023 | आयपीएल मिनी लिलावामध्ये ‘या’ 15 वर्षीय खेळाडूवर लागणार बोली
- Ajit Pawar | “ट्विटरवर कोणी जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का?”; अजित पवारांचा खोचक सवाल
- Sharad Pawar | बायको NCP कार्यकर्त्यासोबत पळून गेल्यामुळे शरद पवारांना धमकी, आरोपीचा धक्कादायक खुलासा
- Devoleena Bhattacharya | ‘या’ व्यक्तीसोबत देवोलीनाने बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर केला फोटो शेअर
- Eknath Shinde | अमित शाह, बोम्मईंसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
Comments are closed.