Amit Shah | …म्हणून एकनाथ शिंदे घेणार अमित शहांची भेट!

Amit Shah | नागपूर: राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहे. भाजप (BJP) च्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचं  दिसून आलं आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दौरे वाढल्याचे दिसून आलं  आहे. अमित शहा आजपासून दोन दिवस नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. तर दोन आठवड्यापूर्वी ते मुंबई दौऱ्यावर होते.

अमित शहांचे महाराष्ट्रामध्ये दौरे वाढले (Amit Shah’s visits to Maharashtra increased)

अमित शहांचे (Amit Shah) महाराष्ट्रामध्ये दौरे वाढत चालले आहे. दोन आठवड्यापूर्वी मुंबई दौऱ्यानंतर आता ते नागपूर दौऱ्यावर असणार आहे. एकाच महिन्यात अमित शहा दुसऱ्यांना महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

गुरुवारी जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली असून मंगळवारी पोलीस (Police) आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती.

राज्यामध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू असताना अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे. त्यांच्या या दौऱ्यानंतर येत्या काळात काही नवीन राजकीय घडामोडी घडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या