InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘…..तोपर्यंत काश्मीरला भारतापासून कुणीही तोडू शकणार नाही’

सांगली मतदारसंघाचे युतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी काश्मीर भारतापासून कोणीही वेगळे करू शकणार नाही असे प्रतिपादन केले

अमित शाह म्हणाले की,  भारतीय जनता पक्षात जोवर जीव आहे तोवर काश्मीरला भारतापासून कुणीही वेगळं करू शकणार नाही.

शाह म्हणाले की, एअर स्ट्राईकद्वारे पाकला घरात घुसून मारले, तरीही काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून संशय घेतला जात आहे. देशाला सुरक्षित करण्याचे काम मोदी सरकारने केलं आहे. पुलवामा सारख्या हल्ल्यानंतर जेव्हा एअर स्ट्राईकने उत्तर दिले जाते तेव्हा त्याचे पुरावे मागितले जातात. ही किती दुर्दैवी घटना आहे असे शाह यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply