‘काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा ढोंगीपणा करत आहे’; अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्ला

ज्यात युतीला बहुमत मिळाल्यानंतरही भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागलं. शिवसेनेनं राष्ट्रवादी,काँग्रेसच्या साथीने सरकार स्थापन केलं. यावरून गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसला सुनावलं. काँग्रेसनं सत्तेसाठी केलेल्या या तडजोडीवरून अमित शहा यांनी लोकसभेत जोरदार हल्लाबोल केला.

सोमवारी लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक 311 मतांनी मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या विरोधात 80 मते पडली. दरम्यान, या चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणाी साधला. काँग्रेस नेते शशी थरूर, शिवेसेना नेते विनायक राउत आणि एमआयएमचे असाउद्दीने ओवेसी यांची मागणी फेटाळण्यात आली. लोकसभेनंतर आता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर चर्चेवेळी मोठा गदारोळ झाला. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. त्याला उत्तर देताना अमित शहांनी काँग्रेसचं धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा ढोंगीपणा करत असल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेससारखा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही. केरळमध्ये मुस्लिम लीगसोबत सत्तेत तर महाराष्ट्रात शिवसेनेसोबत काँग्रेसनं सरकार स्थापन केलं आहे. तसंच मुस्लिमांबाबत कोणताही द्वेष नाही आणि हे विधेयक येणारच असा दावाही अमित शहांनी केला.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.