अमित शहा यांनी राजीनामा द्यावा ; काँग्रेसची मोठी मागणी

मुंबई : ठाकरे सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख याच्यावर जो बदल्यांसंदर्भात गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या संदर्भात सीबीआयकडून एक धक्कादायक माहिती समोर आली असून या माहितीत देशमुख यांचा या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचे सीबीआयच्या चौकशीतून समोर आले आहे. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिलीय.

सावंत यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआयच्या तपासात अनिल देशमुख हे निर्दोष आहेत, मग त्यांच्यावर आरोप लावून सीबीआयला कामाला कोणी लावलं?, हा सवाल सचिन सावंत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. केंद्र सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करून तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला धोका पोहचवण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे नसताना सुद्धा दबाव तंत्राचा वापर करून एफआरआय नोंदवण्यात आला. एफआरआय कोणाच्या सांगण्यावरून नोंदवला गेला ते स्पष्ट करावं आणि यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असंही सचिन सावंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा